Plastic Tea Strainer : चहा गाळण्यासाठी प्लास्टिकची गाळणी वापरताय? आत्ताच थांबवा नाहीतर...

प्लास्टिकच्या गाळणीत चहा गाळण्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात
Plastic Tea Strainer
Plastic Tea Straineresakal

Plastic Tea Strainer : प्रत्येक घरी सकाळची सुरुवात चहाने होते. चहाने अनेकांना ताजेतवाने वाटते. त्यामुळे प्रत्येक घरी काळा किंवा दूधाचा दहा बनतोच. मात्र चहा झाल्यानंतर चहा गाळण्यासाठी तुम्ही कोणती चहा गाळणी वापरता ते बघणे पण फार महत्वाचे आहे. आणि तुम्ही जर चहासाठी प्लास्टिकची गाळणी वापरत असाल तर आत्ताच थांबवा. कारण प्लास्टिकच्या गाळणीत चहा गाळण्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. चला तर जाणून घेऊया याबाबत सविस्तर.

चहासाठी प्लास्टिकची गाळणी वापरण्याची चूक करू नका

चहा किंवा कुठलेही अन्नपदार्थ जेव्हा प्लास्टिकच्या संपर्कात येतात तेव्हा ते आरोग्यासाठी हानिकारक ठरतात, असा दावा जॉ भूमेश त्यागी यांनी केला आहे. फक्त प्लास्टिकची गाळणीच नाही तर प्लास्टिकचे कप, प्लेट, चमचे हेसुद्धा नुकसानदायक ठरू शकतात.

अनेकदा प्लास्टिकची गाळणी ही रिसायकल्ड केलेल्या प्लास्टिकपासून तयार केली जाते. त्यातून तुम्ही चहा गाळता. त्यामुळं त्यात असलेले टॉक्सिक केमिकल्स तुमच्या चहा व किटलीत मिसळतात. त्यामुळं तुम्हाला गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. 

प्लास्टिकच्या गाळणीचा सातत्याने वापर केल्यास मायक्रोप्लास्टिक निर्माण होतात. अनेकदा लोक बाहेरून चहा मागवतात तोसुद्धा प्लॅस्टिकच्या पिशवीत देण्यात येतो. मात्र प्लास्टिकच्या पिशवीत चहा मागवल्याने त्याचे दुष्परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतात.

प्लास्टिकची गाळणी वापरण्याचे तोटे

कॅन्सरचा धोका

प्लास्टिकमध्ये मेट्रोसेमिन आणि बिस्फीनॉलसारखे हानिकारक केमिकल्स असतात. जे आपल्या शरीरात कॅन्सर पसरवण्याचे काम करतात. त्यामुळं तुमच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा आजच सावध व्हा.

Plastic Tea Strainer
Plastic Bag : प्लास्टिक पिशव्यांचा फेरवापर; पर्यावरण संवर्धनासाठी ‘स्टार्टअप’चा पुढाकार

किडनीवर परिणाम 

अनेक संशोधनात असा दावा केला गेलाय की,  प्लास्टिकमुळं किडनीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. किडनीच्या फिल्टरिंग प्रोसेसवर परिणाम होतो. 

पुरुषांमध्ये नपुंसकता 

प्लास्टिकच्या वापराने पुरुषांच्या स्पर्म काउंटवरही त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. तेव्हा पुरुषांनी आजच प्लास्टिकच्या वस्तू वापरणे बंद करावे. (Health)

Plastic Tea Strainer
Plastic Bottle Germs : प्लास्टिकच्या बॉटलने पाणी का पिऊ नये? कारण वाचाल तर...

पचनसंस्था मंदावते

प्लास्टिकच्या गाळणीतून निघणारे मायक्रोप्लास्टिक आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. त्यामुळं आपली पाचनसंस्था बिघडू शकते. 

मेंदूवर परिणाम

प्लास्टिकमध्ये असलेले धोकादायक केमिकल्स केमिकल्स तुमच्या मेंदूला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळं तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता यावरसुद्धा परिणाम होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com