Heart Care Tips | हेल्थ वेल्थ : हृदय सांभाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heart Care Tips

Heart Care Tips: हृदयाच्या आरोग्य आणि तंदुरुस्तीबद्दल जागरूकता वाढली आहे. शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त आणि पोषकतत्त्वे पुरवण्याचे काम हृदय करते.

Heart Care Tips: हेल्थ वेल्थ : हृदय सांभाळा

- विकास सिंह, संस्थापक, फिटपेज ॲप

हृदयाच्या आरोग्य आणि तंदुरुस्तीबद्दल जागरूकता वाढली आहे. शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त आणि पोषकतत्त्वे पुरवण्याचे काम हृदय करते, म्हणून हृदयाच्या सामान्य कार्यामध्ये कोणताही त्रास झाल्यास संपूर्ण शरीरात अनेक गुंतागुंत निर्माण होतात. तुमचे हृदय चांगले आहे की नाही हे तुम्हाला कसे कळेल?

डॉक्टर अनेकदा तुमची नाडी तपासतात. त्यांना हृदयाचे कार्य तपशीलवार तपासायचे असल्यास ईसीजी किंवा इतर चाचण्या करून घेण्याचा सल्ला देतात. हृदयाचे आरोग्य आणि फिटनेस जाणण्यासाठी हार्टबीट महत्त्वपूर्ण आहेत.

रेस्टिंग हार्ट रेट (RHR) आणि हार्ट रेट व्हेरिएबिलिटी (HRV) हे स्पोर्ट्समधील लोकप्रिय मार्कर आहेत. त्यांचा अर्थ काय ते समजून घेऊया.

‘आरएचआर’ म्हणजे तुम्ही सक्रिय नसताना हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती वेळा होतात. तुमचे वय, वजन, औषधोपचार, दिवसाची वेळ, झोप यावर ते अवलंबून असते. नियमितपणे ट्रेनिंग करतो त्यांच्यासाठी प्रति मिनिट ६० बीट्स पेक्षा कमी ‘आरएचआर’ चांगले आहे.

सक्रिय नसलेल्यांसाठी ६० पेक्षा कमी ‘आरएचआर’ हा चिंतेचा विषय असू शकतो. डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य राहील. ‘आरएचआर’ ९०च्या वर असणेही चिंतेचा विषय आहे. फिटनेस नसणे, ओव्हरट्रेनिंग, डिहायड्रेशन, ताप, थकवा, उच्च रक्तदाब सूचित करते.

हार्ट रेट व्हेरिएबिलिटी म्हणजे हृदयाच्या दोन ठोक्यांमधील फरक आहे. आत्ताच दीर्घ श्वास घ्या, आणि तुमच्या लक्षात येईल की तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात. श्वास सोडता तसे ठोके कमी होतात. हृदयाचा ठोका वाढवण्याची आणि ठोकण्याचा दर कमी करण्याची ही क्षमता यामध्ये आहे.

कोणालाही हृदयरोग होण्याची शक्यता असते. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना हृदयविकार होण्याची शक्यता कमी असते. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग टाळण्यासाठी निरोगी जीवनशैलीचे पालन करणे आवश्यक आहे.

पौष्टिक आहार घ्या

 • आहारात अधिक भाज्या, फळे, कडधान्य आणि शेंगांचा समावेश करा.

 • हेल्दी फॅट आणि फायबरयुक्त पदार्थांची निवड करा.

 • ट्रान्स, सॅच्युरेटेड फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल जास्त असलेले पदार्थ टाळा.

 • तुमच्या आहारात प्रक्रिया केलेले पदार्थ, साखर आणि मीठ यांचे सेवन मर्यादित ठेवा

 • अल्कोहोलचे सेवन टाळा.

 • नियमित व्यायाम करा

 • चांगली आणि पुरेशी झोप घ्या

 • ताणाचे व्यवस्थापन करा

 • दिवसभर सक्रिय राहण्याचा आणि निरोगी वजन राखण्याचा प्रयत्न करावा. विशेषत-: पोटाच्या आसपास असलेला भाग, हृदयावर आणि रक्तवाहिन्यांवर जास्त ताण पडून तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. दर ३० मिनिटांनी कामात ब्रेक घ्या

 • तुमचा आवडता खेळ खेळा

 • ध्यानासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करा

 • धावायला किंवा फिरायला जा

उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल पातळी, लठ्ठपणा आणि मधुमेह यासारख्या इतर वैद्यकीय स्थितींमुळे हृदयविकार होण्याचा धोका वाढू शकतो, नियमित आरोग्य तपासणी या सर्व गोष्टींना नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते.

तुम्हाला काही चिंता असल्यास, आरोग्य तपासणी आणि स्क्रीनिंगसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. पुरेशी काळजी घ्या आणि निरोगी सक्रिय जीवन जगणे सुरू करा.

टॅग्स :heart attackWealthhealth