
Vinod Kambli Has Brain Clot: भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना बऱ्याच काळापासून आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. नुकतेच त्यांना ताप व डोकेदुखीचा त्रास होत असल्याने हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले होते. तेथे काही चाचण्या केल्यानंतर विनोद कांबळी यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्या असल्याचे त्यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. विवेक त्रिवेदी यांनी सांगितले. विनोद कांबळी यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
तज्ज्ञांच्या मते मेंदूतील रक्ताच्या गाठींमुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका असतो. स्ट्रोकवर वेळीच उपचार नाही झाले तर त्यामुळे मृत्यूसुद्धा होऊ शकतो. भारतात एकूण मृत्युंपैकी ८ मृत्यूमागील कारण स्ट्रोक असते. इंडियन स्ट्रोक असोसिएशनच्या अनुसार भारतात दरवर्षी १२ ते १३ लाख लोकांना स्ट्रोक येतो.