
"Amma is Pregnant!" अवघडलेल्या पित्याचा 23 वर्षांच्या लेकीला फोन...
Kerala Viral News : बऱ्याचदा काही घटना आयुष्यात अनपेक्षितपणे घडतात. अशावेळी त्यावर कसा प्रतिसाद द्यावा हे समजत नाही. पण त्याही धीराने सामोरे जाणं हे किती सकारात्मक परिणाम देऊ शकताता याची जाणीव करून देणारी एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
ही पोस्ट लिहिणारी लेखिका, कथा आणि कुटुंब केरळमधील सुशिक्षीत आहे. ज्या वयात आता सर्व कर्तव्य आटोपत आले आहेत, आता निवांत वेळ घालवण्याचे प्लॅन होतात, त्या वयात नवीन जाबाबदारी अचानक कशी स्वीकारायची असा प्रश्न पडतो.
असाच एक किस्सा या केरळच्या मुलीने सोशल मीडियावरच्या ह्युमन्स इन बॉम्बे या पेज वर शेअर केला आहे. त्यात त्या २३ वर्षीय मुलीने आपल्या घरातला हा किस्सा सांगितला आहे.
एक दिवस वडिलांचा फोन आला. तुझी अम्मा प्रेग्नंट असल्याचं सांगितलं. त्यावेळी काय रिअॅक्ट करावं कळलं नाही. कारण तेव्हा ८ महिने झालेले होते. मुळात अम्मा, अप्पांनाही ७ व्या महिन्यातच समजलं की, अम्मा ७ महिन्यांची प्रेग्नंट आहे. अम्माचं वय ४७ होतं.
ती मुलगी लहान होती तेव्हा तिला कोणीतरी भावंड हवं म्हणून ती सतत आई-वडिलांकडे हट्ट करे. पण तिच्या प्रेग्नंसीच्यावेळी आईच्या गर्भाशयात काहीतरी प्रॉब्लेम झाल्याने पुन्हा मुल होणं शक्य नाही असं त्यांना डॉक्टरांनी सांगितलेलं आणि याच गोष्टीवर त्यांनी ही बातमी कळेपर्यंत विश्वास ठेवलेला होता.
त्यामुळे जेव्हा वयाच्या ४७ वर्षी अम्माला पाळी आली नाही आणि पोट थोडं जड वाटू लागलं त्यावेळी प्रेग्नंसीचा विचार येण्याऐवजी मेनोपॉज सुरू झाला असेल असे मानून त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. पण जेव्हा मंदिरात त्यांना चक्कर आल्याने त्या पडल्या, तेव्हा डॉक्टरने तपासल्यावर सांगितलं की, त्या प्रेग्नंट आहेत.
पण गोष्टी आपल्या २३ वर्षाच्या मुलीला सांगण्यासाठी त्यांना १ महिना लागला कारण ती यावर कशी प्रतिसाद देईल याची त्यांना भीती वाटत होती. त्यानंतर काही दिवसांनी ती घरी गेली तेव्हा अम्माच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाली, ज्या गोष्टीची मी एवढी वर्ष वाट पाहत होते, ती कळल्यावर मला लाज का वाटेल?
तिच्या या बोलण्याने अम्मा-अप्पांना आधार वाटला. ९ महिन्यांनी एका गोंड मुलीला अम्माने जन्म दिला. तिच्या तोंडून दीदी शब्द ऐकण्यासाठी मी उत्सुक असल्याचं तिनं लिहिलं आहे. ही गोष्ट जेव्हा नातेवाईकांना सांगितली तेव्हा काहींनी खरच काळजीने विचारपूस केली तर काहींनी टोमणे मारल्याचही तिनं लिहिलं आहे. पण आम्ही एकत्र आहोत त्यामुळे याचा आम्हाला काहीही फरक पडत नसल्याचं ती सांगते.
या पोस्टवर नेटकऱ्यांनीही भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. धाडसी निर्णय, सकारात्मक प्रतिसाद म्हणत बहुतेकांनी या पोस्टचं स्वागतच केलं आहे.