

The Virtual Trap: Understanding the Risks of Online Intimacy and Sexual Addiction
Sakal
डॉ. स्मिता प्रकाश जोशी, समुपदेशक
प्रश्न : मी २३ वर्षांचा विद्यार्थी आहे. इन्स्टाग्रामवर एका मुलीबरोबर चॅट करताना तिच्या प्रेमात पडलो. आम्ही रोज खूप वेळ बोलत होतो. तिने तिचे काही फोटो मला ‘शेअर’ केले. त्यानंतर आम्ही आभासी पद्धतीने शारीरिक संबंध करत होतो. मला हळूहळू त्याची सवय लागली आणि एक दिवस अचानक ती संपर्कातून निघून गेली. तिच्याशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती कुठे आहे ते कळत नाही. आता तिच्याशिवाय काही सुचत नाही, अभ्यासात लक्ष लागत नाही. करिअरच्या संधीही हातातून निसटून जात आहेत. माझे लैंगिक विचार आणि सवयी नियंत्रणाबाहेर जात आहेत हे मला जाणवते आहे. मला अपराधीही वाटते, पण थांबवता येत नाही. मी यातून बाहेर कसा पडू?
उत्तर : तुझी अवस्था समजण्यासारखी आहे. जेव्हा भावनिक नाते आभासी माध्यमातून तयार होते, तेव्हा ते खूप तीव्र वाटू शकते; पण ते वास्तव नसते. हल्ली अनेक तरुण मुले-मुली सोशल मीडियावर पटकन गुंततात. फोटो शेअर करणे, आभासी जवळीक निर्माण करणे किंवा अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये अडकणे, हे आकर्षक वाटत असले तरी ते धोकादायक असू शकते- कारण समोरची व्यक्ती खरी कोण आहे, तिचा हेतू काय आहे, हे आपल्याला माहिती नसते. अशा गोष्टींमुळे भावनिक, मानसिक आणि कधी कधी कायदेशीर अडचणीही निर्माण होऊ शकतात.