
Vitamin D is a crucial nutrient, but treat it like medicine to avoid serious side effects.
Sakal
डॉ. ऋतुपर्ण शिंदे - हृदयरोगतज्ज्ञ
व्हिटॅमिन डीचं महत्त्व, त्याची कमतरता, त्याबाबतची लक्षणं यांच्याबाबत आपण गेल्या आठवड्यात बघितलं. आता इतर काही पैलू बघूया.
तपासणी कधी करावी; कधी टाळावी?
तपासणी या स्थितीत योग्य
वारंवार हाडदुखी, स्नायू कमकुवतपणा, वारंवार फ्रॅक्चर, रजोनिवृत्तीपश्चात महिला, लिव्हर, किडनीचे आजार, जास्त वजन, स्थूलता.
दीर्घकाळ स्टेरॉइड्स, अँटी-एपिलेप्टिक्स घेणारे, सूर्यप्रकाश कमी मिळणारे लोक.
तपासणीची या स्थितीत गरज नाही
निरोगी, सक्रिय, नियमित सूर्यप्रकाशात राहणारे लोक.
फक्त ‘ट्रेंड’ म्हणून तपासणी करणं शास्त्रीय नाही