Vitamin D
sakal
अलीकडच्या काही वर्षांत एक नवीन आरोग्य ट्रेंड सर्वत्र दिसतो आहे. जवळजवळ प्रत्येकजण ‘सीरम व्हिटॅमिन D3’ चाचणी करत आहे आणि रिपोर्टमध्ये ‘कमी D3’ आलं, की लगेच ६०,००० IU चं सॅशे किंवा इंजेक्शन सुरू केलं जातं.
औषधांच्या दुकानात हे सॅशे सहज मिळतात, डॉक्टर विना-तपासणी लोक एकमेकांना ‘D घ्या, ताकद येईल’ म्हणतात, आणि सोशल मीडियावर हे जीवनसत्त्व इम्युनिटी, एनर्जी, वजन कमी होणं, हाडं मजबूत होणं यांसारख्या सर्व गोष्टींसाठी उपाय म्हणून दाखवलं जातं.
पण वास्तव काय आहे? आपल्याला खरोखरच D ची कमतरता आहे का? की आपण ‘फॅड’ आणि ‘फिअर’ याच्या जाळ्यात अडकत आहोत? चला, यामागील विज्ञान समजून घेऊया.