Diet Tips : अक्रोड, काजू अन् बदामपैकी काय आहे बेस्ट? डायटिशीयन सांगतात कधी अन् किती खावं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diet Tips

Diet Tips : अक्रोड, काजू अन् बदामपैकी काय आहे बेस्ट? डायटिशीयन सांगतात कधी अन् किती खावं...

Walnut Almond And Cashew : ड्रायफ्रुट्स आरोग्यासाठी फार आवश्यक असतात. हे मूळात गरम असल्याने हिवाळ्यात ड्रायफ्रुट्स खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती सुधारते. तसे तर सर्वच प्रकारचा सुकामेवा खावा. पण त्यातही अक्रोड, काजू आणि बदाम हेच जास्त फेमस आहेत. पण यातही सर्वात उपयुक्त काय आहे? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. तर याविषयी तज्ज्ञ काय सांगतात जाणून घेऊया...

अक्रोडमधले पोषक तत्व

अक्रोडमध्ये अनेक व्हिटॅमिन्स असतात. यात ओमेगा ६, फॅटी अ‍ॅसिड, कॅल्शियम, कॉपर, प्रोटीन, सेलेनियम, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स असतात. दिवसभरात फक्त एक अक्रोड खाणं पुरेसं आहे.

बदामातले पोषक तत्व

बदाम सामान्यतः भिजवून खायाला लोक प्राधान्य देतात. यात कॅलरीज, कॅल्शियम, फायबर, प्रोटीन, कॉपर, पोटॅशियम, आयर्न, रायबोफ्लेविन आणि फॉस्फरस असतं. हे एका दिवसात जास्तीत जास्त १० बदाम खाणं योग्य ठरतं.

हेही वाचा: Winter Health : ५५ च्या वरच्या लोकांनी या गोष्टी फॉलो कराव्याच

काजूत मिळणारे पोषक तत्व

काजू फार पोषक ड्रायफ्रुट मानलं जातं. यात हेल्दी फॅटी अ‍ॅसिड, प्रोटीन, व्हिटॅमिन ई, अँटी ऑक्सिडंट, फायबर, आयर्न, मॅग्नेशियम, फॉलेट, कॅल्शियम, झिंक भरपूर प्रमाणात असतं. हे विविध रेसिपीज मध्ये वापरावे.

अक्रोड, बदाम आणि काजूत बेस्ट काय?

तज्ज्ञ म्हणतात हे सर्वच ड्रायफ्रुट्स आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. पण या तीन पैकी कोणतं सगळ्यात बेस्ट असं सांगायचं म्हटलं तर यात अक्रोडची न्युट्रीशनल व्हॅल्यू मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्याला बेस्ट म्हणता येईल.

टॅग्स :diet tips