पृथ्वीवरची अमूल्य संपत्ती पाणी

‘पाणी म्हणजेच जीवन’ या पुराणकथांपासून आधुनिक प्रदूषणापर्यंतचा प्रवास; भगीरथाच्या तपश्चर्येची आठवण करून देत जलसंवर्धनाची तातडीची हाक
From Mythology to Reality: The Crucial Role of Water in Human Survival

From Mythology to Reality: The Crucial Role of Water in Human Survival

Sakal

Updated on

श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित

एका तळ्याचे पाणी प्यायल्यानंतर राजा व त्याच्याबरोबर असणारे अनेक जण मृत्युमुखी पडल्याच्या अशा कथा पुराणांत सापडतात. राजा सगराचे सहस्र पुत्र मृत झाले असताना त्यांना जीवनदान देऊ शकणारे पाणी उपलब्ध नव्हते, अशीही कथा सापडते. पाण्यालाच ‘जीवन’ म्हटले जाते. असे जीवन उपलब्ध नसेल तर काय होईल याची सुंदर गोष्ट म्हणजे ‘गंगावतरण’. सगराचा वारस असलेल्या भगीरथाने खूप तपश्चर्या केली व अनेक प्रयत्नांनी गंगेचा पावन ओघ पुन्हा एकदा पृथ्वीकडे वळविला, त्यानंतर नुसते राजा सगराचे सहस्र मृत पुत्रच जिवंत झाले असे नाही, तर पृथ्वी धनधान्याने समृद्ध झाली. मुळात असे पाण्याचे प्रदूषण का व्हावे व सर्व सृष्टी एवढी निर्जीव का व्हावी? जीवन हे नष्ट होऊन मृत्यूचे थैमान का दिसावे?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com