
Health: High Cholesterol असेल तर हलक्यात घेऊ नका, पुरुषांमध्ये नपुंसकता येण्याचं हे महत्वाचं कारण
Health: आपल्या शरीरासाठी कोलेस्ट्रॉल फार महत्वाचं असते. कोलेस्ट्रॉल हा लीवरमध्ये तयार होणारा मेणासारखा घट्ट पदार्थ आहे. कोलेस्ट्रॉल शरीरातील हार्मोन लवचिक बनवत आणखी अनेक प्रकारच्या हार्मोनचे उत्पादन करते. मात्र याचं प्रमाण जर का तुमच्या शरीरात जास्त झालं असेल तर ते तेवढंच नुकसानदायी ठरतं.
आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. ते म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल. गुड कोलेस्ट्रॉल शरीरात हार्मोन्सचं उत्पादन करतं तर बॅड कोलेस्ट्रॉल शरीरासाठी घातक मानल्या जातं. बॅड कोलेस्ट्रॉलने शरीरातील रक्तवाहिन्या गोठायला सुरूवात होते. आणि तुमचा ब्लड फ्लो थांबतो. या कारणाने हार्ट अटॅक आणि हार्ट स्ट्रोकचा धोका फार वाढतो. शरीरात कोलेस्ट्रॉलची लेवल वाढल्यास अनेक गंभीर समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. ज्यातली एक प्रमुख समस्या म्हणजे नपुंसकता ज्याला विज्ञानाच्या भाषेत इरेक्टाइल डिस्फंक्शन असेही म्हणतात.
पुरुषांच्या नपुंसकतेमागे अनेक कारणं असू शकतात ज्यामध्ये तुमच्या रोगी आरोग्याचाही समावेश असतो. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याने अनेक प्रकारचे आजार उद्भवतात आणि पुरुषांमध्ये नपुंसकता निर्माण होते. याच कारणाने ज्या पुरुषांत कोलेस्ट्रॉल लेवल जास्त असते त्यांच्या नपुंसकतेचा धोकाही जास्त असतो. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी जर का तुम्ही स्टॅनीनचा वापर करत असाल तर नपुंसकतेपासून मुक्त होण्यास फायदेकारी ठरू शकतं.