Weight Gain: वाढलेलं वजन चेष्टा नव्हे, त्यामुळे होतायत हे गंभीर आजार, तुमचंही वजन वाढलंय का? व्हा सावध

वजन वाढ आणि आम्लपित्त यांचा परस्पर संबंध लक्षात घेतला तर आम्लपित्ताचा त्रास कमी करण्यासाठी वजन कमी करणे कसे गरजेचे आहे, हे आपल्याला कळून येईल.
Disadvantages of Weight Gain
Disadvantages of Weight Gainesakal

Disadvantages of Weight Gain: वाढलेल्या वजनामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात, याची कल्पना प्रत्येकालाच असते मात्र सोबतच वाढलेलं वजन अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देतात. सतत जाणवणारा थकवा, हृदयविकार, मधुमेह, सांधेदुखी, असे अनेक आजार वाढलेल्या वजनामुळे सुरू होतात.

या सर्व विकारांबरोबरच आणखी एक नेहमी आढळणारा आजार म्हणजे आम्लपित्त! वजन वाढ आणि आम्लपित्त यांचा परस्पर संबंध लक्षात घेतला तर आम्लपित्ताचा त्रास कमी करण्यासाठी वजन कमी करणे कसे गरजेचे आहे, हे आपल्याला कळून येईल.

आम्लपित्तामध्ये घशामध्ये आणि छातीमध्ये जळजळणे, घशाशी आंबट येणे, तोंड कडू होणे, अशा प्रकारची लक्षणे आढळतात.

आपल्या आजूबाजूचे लोक या आजाराने त्रस्त झालेले आपण बघतो आणि त्यांच्यावर उपाय म्हणून अँटॅसिडच्या गोळ्या घेतल्या जातात; पण सतत आणि बराच काळ ही अशी औषधे घेतल्यामुळे त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात.

Weight Gain Disadvantages
Weight Gain Disadvantages

वजन जास्त असलेल्या लोकांमध्ये वजन कमी केल्याने आम्लपित्ताचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आढळून येतो.

वाढलेल्या वजनामुळे, विशेषतः पोटावरील वाढलेल्या चरबीमुळे, पोटावर जास्त प्रमाणात दाब निर्माण होऊन पोटातील ॲसिड अन्ननलिकेत येऊन आम्लपित्ताचा त्रास सुरू होतो. म्हणूनच वजन कमी करणे, हा आम्लपित्त कमी होण्यासाठी एक उपाय ठरू शकतो.

आम्लपित्त कमी होण्यासाठी खालील गोष्टींचे पालन करावे...

१) आम्लपित्त वाढवणारे पदार्थ, उदा. तळलेले आणि मसालेदार पदार्थ, कॉफी-कार्बोनेटेड पेये, जंक फूड खाणे टाळावे.

२) अतिप्रमाणात खाणे टाळावे.

३) जेवणाच्या वेळा पाळाव्यात. चहा, कॉफीचे प्रमाण कमी करावे.

४) झोपण्यापूर्वी तीन तास काही खाऊ नये.

५) जेवताना प्रत्येक घास सावकाश व चावून खावा.

६) जेवणामध्ये भाज्या व फळांचे प्रमाण जास्त असावे.

७) वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करावा.

८) आपल्या ताण-तणावाचे योग्य प्रकारे नियंत्रण करावे.

पित्त कमी करण्यासाठी आहारात खालील पदार्थांचा समावेश करू शकता...

१) गव्हापेक्षा ज्वारी, बाजरी, नाचणी या धान्यांचा नियमित वापर करावा. ही धान्यं शरीरात अल्क गुणधर्म राखायला मदत करतात. यामुळे आम्लपित्ताचा त्रास कमी होतो.

२) लिंबू पाणी, नारळ पाणी, ताजे ताक यांच्या सेवनाने सुद्धा आम्लपित्त कमी होण्यास मदत होते.

३) फळांमध्ये लिंबू वर्गातील फळे, केळ, अननस यांचा उपयोग होतो.

४) आलं आणि लिंबाचा रस थोडंसं सैंधव घालून घेतल्यास आम्लपित्ताचा त्रास कमी होतो.

५) गुलकंद, सब्जाचे बी पित्तामध्ये भरपूर उपयोगी पडतात. (Health)

Disadvantages of Weight Gain
Weight Gain : हलक्याफुलक्या शरीराचं असं वाढवा वजन

आमसूल सार

साहित्य : २-३ आमसूलं

गूळ चवीनुसार मीठ चवीनुसार

२ चमचे तूप १ चमचा जिरे

१/२ चमचा किसलेले आले

४-५ कडीपत्त्याची पाने

हिंग चिमूटभर. (Weight Gain Issues)

Disadvantages of Weight Gain
Weight Gain : वजन वाढवण्यासाठी मदत करतील हे पदार्थ

कृती : आमसूलं गरम पाण्यात दोन ते तीन तास भिजत ठेवा. नंतर त्याच पाण्यात आमसूल कुस्करून पाणी गाळून घ्या. त्यामध्ये जेवढे आमसुलाचे पाणी असेल त्याच्या तीन पट पाणी घाला.

त्यात चवीनुसार मीठ, गूळ घाला. लहान कढईमध्ये तूप घेऊन ते गरम झाल्यावर त्यात जिरे, हिंग, कडीपत्ता व आले घालून फोडणी करून घ्या.

ही फोडणी आमसुलाच्या पाण्यावर घालून उकळून घ्या. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गरमागरम आमसुलाचे सार जेवणासोबत किंवा अधेमधेही पिऊ शकता.

डॉ. विद्या कुलकर्णी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com