Wheatgrass Juice Benefits शरीराचे वजन नियंत्रणात आणायचंय? मग प्या या हिरव्यागार गवताचा ज्युस

गहू पाण्यात भिजत ठेवल्यानंतर त्यापासून तयार होणाऱ्या गवताच्या सेवनाने किंवा त्याचा ज्युस तयार करून प्यायल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळतात.
Wheat Grass Juice Benefits
Wheat Grass Juice BenefitsSakal
Updated on

Wheat Grass Juice Benefits गहू पाण्यात भिजत ठेवल्यानंतर त्यापासून तयार झालेले गवत म्हणजे व्हीटग्रास. या गवतापासून ज्युस तयार करून प्यायल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळू शकतात. पण लक्षात ठेवा गव्हाच्या कोवळ्या गवतापासूनच रस तयार केला जातो. 

या रसाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीरास कित्येक लाभ मिळतात. या हिरव्यागार गवतामध्ये पोषणतत्त्वांचा मोठ्या प्रमाणात साठा असतो. कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए यासह लोह यासारख्या पोषकघटकांचा समावेश व्हीटग्रासमध्ये आहे. व्हीटग्रासचे सेवन केल्यास आरोग्यास कोणकोणते लाभ मिळतात, जाणून घेऊया सविस्तर…

Wheat Grass Juice Benefits
Yoga For Spinal Cord : तुमच्याही पाठीला बाक आलंय का? पाठीचा कणा सरळ होण्यासाठी करा ही आसने

सर्वोत्तम डिटॉक्स ड्रिंक  

व्हीटग्रासमध्ये क्लोरोफिल नावाचे घटक असते, ज्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. यातील क्लोरोफिल हे घटक शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर सहजरित्या फेकण्याचे कार्य करतात.   

Wheat Grass Juice Benefits
Weight Loss Drink हे हेल्दी ड्रिंक प्या! शरीर डिटॉक्स होण्यासह वजनही घटेल, जाणून घ्या फायदे

पचनप्रक्रिया सुधारते

शरीर डिटॉक्स होण्यासह व्हीटग्रास ज्युसमुळे शरीराची पचनप्रक्रिया देखील सुधारते. संपूर्ण शरीर डिटॉक्स झाल्याने यकृताचे कार्य सुरळीत सुरू राहते. 

Wheat Grass Juice Benefits
अंड्यासह कधीही खाऊ नका हे खाद्यपदार्थ, आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम

वजन कमी होण्यास मदत मिळते

नियमित सकाळी व्हीटग्रासचा ज्युस प्यायल्यास शरीराचे वजन घटण्यास मदत मिळते. व्हीटग्रासमध्ये फायबरचे प्रमाण खूप तर कॅलरी कमी प्रमाणात असते. या घटकांमुळे पोट भरलेले राहते. ज्यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होत नाही. यामुळेच शरीराचे वजन कमी होण्यास मदत मिळते. 

कोलेस्ट्रॉल राहते नियंत्रणात 

उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण झाल्यास व्हीटग्रासचा ज्युस प्यायल्यास फायदे मिळतात. या रसामध्ये हायपोलिपिडेमिक गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीरातील हाय कोलेस्ट्रॉलची समस्या नियंत्रणात येण्यास मदत मिळते.

घरच्या घरी कसे पिकवावे व्हीटग्रास?

  • गहू निवडून ते स्वच्छ करून घ्या. 

  • यानंतर एका भांड्यात पाणी ठेवा आणि त्यावर एका चाळणीमध्ये गहू ठेवावेत. 

  • काही दिवसांनंतर गव्हाला अंकुर येण्यास सुरुवात होईल व गवतही तयार होईल.

  • कोवळ्या गवतापासून आपण घरच्या घरी ज्युस तयार करून ते पिऊ शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com