Heart Attack Vs Panic Attack : हार्ट अटॅक अन् पॅनिक अटॅकमध्ये नेमका काय फरक आहे? जाणून घ्या अतंर अन् धोका

त्याचबरोबर हृदयविकाराच्या झटक्यासोबतच पॅनिक अटॅकच्या समस्याही वाढत आहेत
Heart Attack Vs Panic Attack
Heart Attack Vs Panic Attackesakal

Heart Attack Vs Panic Attack : आज बदलत्या किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे लोक विविध आजारांना बळी पडत आहेत. गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिथे पूर्वी मोठ्या वृद्ध लोकांना हृदयविकाराचा झटका येत असे, तिथे आजच्या काळात तरुणांनाही हृदयविकाराच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर हृदयविकाराच्या झटक्यासोबतच पॅनिक अटॅकच्या समस्याही वाढत आहेत.

तज्ज्ञांच्या मते पॅनिक अटॅक हा हृदयविकाराच्या झटक्याइतकाच धोकादायक आहे. बर्‍याच वेळा लोकांना हृदयविकाराचा झटका आणि पॅनिक अटॅक या दोन्ही गोष्टी समान वाटतात. त्यामुळे रुग्णाला त्याचे काय होत आहे हे समजत नाही. जर तुम्हालाही या दोघांमधला फरक कळत नसेल तर हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅकमध्ये काय फरक आहे ते जाणून घेऊया.

जेव्हा मानवी हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो किंवा धमन्या 100% ब्लॉक होतात, अशा स्थितीत व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी अनेक प्रकारची लक्षणे माणसाला दिसतात. यापैकी, छातीत दुखणे किंवा छातीत जडपणा जाणवणे हे सर्वात सामान्य लक्षण आहे. याशिवाय श्वास लागणे, घाम येणे किंवा उलट्या होणे ही सामान्य लक्षणे आहेत. ही लक्षणे लगेच किंवा काही तासांनंतर दिसतात.

पॅनीक अटॅक म्हणजे काय?

तज्ञांच्या मते, पॅनीक अटॅक हा एक प्रकारची चिंता आहे, जी खूप गंभीर असण्यासोबतच अचानक विकसित होते. पॅनीक अटॅक दरम्यान हृदयाचे ठोके वाढणे, तसेच श्वासोच्छवासाचा त्रास, डोके फिरणे आणि शरीर थरथरणे इत्यादी लक्षणे विकसित होतात.

Heart Attack Vs Panic Attack
Kidney Health Tips : किडनीत झालेला बिघाड जिवावर बेतू शकतो; शरीरातील ही लक्षणे म्हणजे धोक्याची घंटा

हृदयविकाराचा झटका आणि पॅनिक अटॅकची सामान्य लक्षणे

अहवालानुसार, यूकेच्या आरोग्य तज्ञांनी सांगितले की हृदयविकाराचा झटका आणि पॅनिक अटॅक या दोन्हींमध्ये छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि घाम येणे अशी लक्षणे आहेत. (Heart Attack)

हृदयविकाराचा झटका आणि पॅनीक अटॅकमधील फरक

ब्रिटनच्या आरोग्य तज्ञांनी त्यांच्या अहवालातील मुख्य फरक सांगितला की पॅनिक अटॅक कधीही येऊ शकतो, हा अटॅक तुम्ही आराम करत असाल किंवा झोपेत असाल तेव्हाही येऊ शकतो.

Heart Attack Vs Panic Attack
Walking Health Tips : तुरू तुरू नाहीतर हळू हळू चालणं ठरेल फायद्याचं, Diabetes, Heart Attack ची करेल सुट्टी!

त्याचबरोबर जास्त काम करत असताना हृदयविकाराचा झटका येतो. हृदयविकाराचा झटका फक्त छातीपर्यंत राहत नाही, तर अनेकांच्या हा त्रास हात आणि मानेपर्यंत पोहोचतो. (Health News)

हृदयविकाराचा झटका आणि पॅनीक अटॅक टाळा

जर तुम्हाला अचानक छातीत दुखत असेल, जे 2 ते 3 मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकत असेल आणि वेदना इतर अवयवांमध्ये पसरत असेल, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. हृदयविकाराचा झटका आल्यास कोणत्याही प्रकारचा विलंब घातक ठरू शकतो. तुम्हाला पुन्हा पुन्हा पॅनीक अटॅक येत असल्यास, योग्य उपचार घ्या, तुम्हाला लक्षणे नियंत्रित करण्यासाठी काही औषध दिले जाऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com