
Symptoms Of Hernia That Are Commonly Ignored: बऱ्याचदा आपल्याला असे ऐकायला येते की एखाद्या व्यक्तीच्या पोटात किंवा जांघेच्या भागात सूज किंवा गाठ जाणवत आहे. हे सुरुवातीला किरकोळ वाटू शकते, पण वेळेनुसार हा त्रास वाढत जातो. हे हर्निया असण्याचे लक्षण असू शकते. हर्निया स्नायूंमधील दुर्बलता आणि जास्त ताण यामुळे हा आजार उद्भवतो. यामुळे शरीरातील अंतर्गत अवयव त्यांच्या मूळ जागेवरून सरकत बाहेर येतात. हर्नियाची लक्षणे वेळीच ओळखली नाहीत तर गंभीर समस्या होऊ शकतात, त्यामुळे त्याची कारणे व उपाय जाणून घेणे आवश्यक आहे.