Benefits of Pantyhose: पँटीहोज खरोखर स्त्रियांसाठी फायदेशीर आहेत का? काय म्हणतो न्यूयॉर्कचा सर्व्हे?

Benefits of Pantyhose: तुमच्या बॅक्टेरियाच्या समस्या वाढतात आणि परिणामी युरीन इन्फेक्शन होऊ शकते
Benefits of Pantyhose
Benefits of Pantyhoseesakal
Updated on

Benefits of Pantyhose : आपण अनेकदा अनेक चित्रपटांमध्ये मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये मुलींच्या पायात लांब जरासे पारदर्शक मोजे परिधान केलेले बघितलेले असतील, पण यांना नक्की काय म्हणतात?

तुम्हाला हे माहिती नसणं यात काही वाईट नाही, एखाद्या गोष्टीची माहिती आपल्याला तेव्हाच होते जेव्हा त्या गोष्टीची गरज असते तर... याला पँटीहोज म्हणतात याला आणखीन एक शब्द आहे जो जरा जास्त प्रसिद्ध आहे आणि तो म्हणजे स्टॉकिंग.

पँटीहोज हे अर्धपारदर्शक लेग वेअर आहेत, हे पायाच्या बोटांपासून कंबरेपर्यंत अशा मापाचे असतात आणि मोज्यांसारखेच असतात, स्त्रिया बहुतेक ते स्कर्टच्या खाली परिधान करतात. शिवाय आकर्षक दिसण्यासाठी आणि काहीवेळा आरोग्याच्या फायद्यासाठी देखील ते परिधान करतात. पण ते खरंच स्त्रियांसाठी फायदेशीर आहेत का? जाणून घेऊया...

Benefits of Pantyhose
Fashion : नव्या नवरीनं सजावं तर सोनालीसारखं, पोरींनो घ्या फॅशन टीप्स

पँटीहोज महिलांसाठी फायदेशीर आहेत का?

अनेक वेळा जेव्हा पायांमध्ये रक्ताभिसरण नीट होत नाही आणि नसांमध्ये रक्त गोठू लागते तेव्हा खूप वेदना होतात. या परिस्थितीत, तज्ञ म्हणतात की पँटीहोज उपयुक्त आहेत, ते परिधान केल्यानंतर, आपल्या वेदना कमी होऊ शकतात आणि रक्ताभिसरण देखील सुधारु शकते. यासोबतच गुडघेदुखी पासूनही आराम मिळतो.

Benefits of Pantyhose
Maharashtrian Look : खणाच्या साडीवर चुकूनही परिधान करु नका असे दागिने... प्राजक्ताकडून घ्या टिप्स

Everyday Health मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, न्यूयॉर्कच्या वेन ट्रीटमेंट सेंटरचे एमडी लुईस नवारो म्हणतात की, पँटीहोज घातल्यानंतर त्याचे प्रेशर हे आपल्या पाऊलापासून गुडघ्यांपर्यंत असते, त्यामुळे ते रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे महिलांना पाय गुडघेदुखीत आराम मिळतो.

Benefits of Pantyhose
Marathi T Shirt : पहा मराठी म्हणींचे एकापेक्षा एक भन्नाट टि शर्ट

पायांच्या सुजेपासून होते सुटका

पँटीहोजबद्दल असे म्हटले जाते की जर महिलांनी ते परिधान केले तर त्यांना घोट्याभोवती सूज आराम येणे थांबते आणि जेव्हा तुम्ही लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल तेव्हा ते अधिक आरामदायी असतात, मग ते कार, ट्रेन किंवा विमानाने असो... पायांना आराम देण्यासाठी पँटीहोज अधिक चांगले असतात.

याच मुख्य कारण म्हणजे, या प्रवसांमध्ये, पाय दीर्घकाळ त्याच स्थितीत राहतात, ज्यामुळे त्यांचे रक्ताभिसरण नीट होत नाही, पण जर तुम्ही पँटीहोज परिधान करतात तेव्हा तुमच्या पायांच्या नसांमध्ये रक्ताभिसरण चांगले होते आणि तुमचे पाय सुजणार नाहीत.

Benefits of Pantyhose
Rashami Desai : केसात गजरा, नाकात नथ.. जांभळ्या साडीत रश्मीचा मराठमोळा लूक

पँटीहोजचे तोटे काय आहेत

Everyday Health ला दिलेल्या एका मुलाखतीत, राधिका रिबल, एमडी, यूसीएलए मेडिकल सेंटर, लॉस एंजेलिस यांनी याच्याशी संबंधित तोट्यांबद्दल स्पष्टीकरण दिले आणि त्या म्हणाल्या, "जर तुम्हाला युरीन इन्फेक्शनचा त्रास होत असेल तर तुम्ही पँटीहोज घालू नये.

पँटीहॉज हे सिंथेटिक मटेरियलपासून बनवले जातात आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही हे परिधान करतात तेव्हा तुमच्या बॅक्टेरियाच्या समस्या वाढतात आणि परिणामी युरीन इन्फेक्शन होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com