
root canal procedure: वेदनांचा कहर झाल्यामुळे दात किडल्यानंतर पूर्वी तो काढून टाकण्याकडे सर्वसामान्य नागरिकांचा कल असायचा. मात्र, अलीकडे याबाबत जागृती होत आहे. आता दंतवैद्यकशास्त्रातील महत्त्वपूर्ण अशा रूट कॅनल ट्रीटमेंटमुळे किडलेल्या दातांमुळे होणाऱ्या वेदनेपासून मुक्ती तर साधली गेलीच, शिवाय दंतपंक्तींचे सौंदर्यही अबाधित राहिले. अर्थात दातांच्या स्वच्छतेबाबत जागरूकता ठेवलीच गेली पाहिजे. दात किडण्याची वेळ येऊ द्यायला नकोच. तर जाणून घेऊया काय असते रूट कॅनल ट्रीटमेंट. दोनवेळा ब्रश न केल्याने, जेवणानंतर चूळ न भरल्याने, सतत गोड पदार्थांचे सेवन केल्याने अशा विविध कारणांमुळे दातांना कीड लागते. प्राथमिक अवस्थेतील ही कीड वेळीच उपचार न केल्याने वाढत जाते. जेव्हा दातांच्या पल्पमध्ये कीडच्या सूक्ष्म जंतूंचा प्रादुर्भाव होतो, तेव्हा दंतवैद्यक रूट कॅनल ट्रीटमेंट (RCT) करतात.