

What is Snail Therapy
sakal
Snail Mucin for Skin: स्नेल थेरपी म्हणजे गोगलगायीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या चिकट द्रवाचा (Snail Mucin) त्वचेची काळजी घेण्यासाठी वापर करणे. आजकाल स्किनकेअरमध्ये हा प्रकार लोकप्रिय होत आहे. काही ब्युटी ट्रीटमेंटमध्ये थेट जिवंत गोगलगायी चेहऱ्यावर सोडल्या जातात, तर काही उत्पादनांमध्ये या द्रवाचा वापर केला जातो. अशा उत्पादनांमध्ये सीरम, क्रीम आणि फेस एसेंस यांचा समावेश होतो.
गोगलगायीच्या या चिकट द्रवामध्ये हायलुरॉनिक अॅसिड, ग्लायकोलिक अॅसिड, पेप्टाइड्स आणि अॅलन्टॉइन यांसारखे घटक असतात. हे घटक त्वचेला ओलावा देण्यास आणि त्वचेची काळजी घेण्यास मदत करू शकतात.