
Know The Causes And Treatment For Spondylosis: "मला स्पॉंडिलोसीसचा त्रास आहे", अशी तक्रार आजकाल वारंवार रुग्णांकडून केली जाते. "स्पॉंडिलोसीस" म्हणजे नेमकं काय, याची जिज्ञासा अनेक जणांना असते. तेव्हा आपण याची शास्त्रशुद्ध माहिती समजावून घेऊ या.
मानदुखी, पाठदुखी किंवा कंबरदुखीचे अनेक प्रकार आहेत. बऱ्याच वेळा मानदुखी, पाठदुखीचे कारण फारसे गंभीर नसते. तरीही पाठदुखी/मानदुखी रुग्णाला हैराण करते व कमीअधिक त्रास देते. कधी-कधी या व्याधीमुळे आजाऱ्याला कित्येक वर्षे सर्वसामान्य जीवन जगणेही कठीण होऊन बसते. सर्दी, खोकला आणि फ्ल्यू यांसारखे श्वसनविषयक विकार वगळले, तर रोग्याला डॉक्टरांकडे जाण्यास भाग पाडणारा विकार म्हणजे मानदुखी, पाठदुखी होय. अन्य कोणत्याही रोगांवरील औषधांपेक्षाही मानदुखी, पाठदुखीवरील औषधे अधिक प्रमाणात वापरली जातात.