
What To Do If Down With Fever: निव्वळ तापाच्या प्रकारावरून म्हणजे केव्हा येतो, किती चढतो या बाबींवरून तापाचे कारण साधारणपणे ओळखता येते. पण हल्ली अनेक डॉक्टरांशी बोलताना असे जाणवते, की पूर्वी वैद्यकशास्त्रात वर्णन केल्याप्रमाणेच आढळणारा ताप रोगनिदानास साह्यभूत ठरत असे, तसे हल्ली दिसत नाही. हल्ली ताप बऱ्याचदा "टिपिकल' स्वरूपाचा नसतो.
(पुस्तकांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे असतोच असे नाही) अशा वेळी तापाबरोबरच असणारी अन्य लक्षणे महत्त्वाची ठरतात. कोणत्या अवयवसंस्थेमध्ये जंतुसंसर्ग झाला आहे ते या अन्य लक्षणांवरून ओळखले की मग रोगनिदान सोपे होते. उदा.- खोकला असेल तर श्वसनसंस्थेमध्ये संसर्ग, अंग मोडून येत असेल तर विषाणुसंसर्ग किंवा फ्लू इत्यादी.