
थोडक्यात
पावसाळ्यात संधिवात वाढू शकतो, त्यामुळे आहारात गरम, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि सांधांना पोषण देणारे पदार्थ घ्यावेत.
आंबट, थंड आणि जड पदार्थ टाळावेत जे संधिवात अधिक वाढवू शकतात.
हळद, आलं, मेथी आणि गरम पाणी हे घरगुती उपाय संधिवात कमी करण्यात मदत करू शकतात.
best foods for arthritis in monsoon: पावसाळ्यात उन्हाच्या तीव्र झळांपासून आराम मिळतो. पण, अनेकांसाठी हा ऋतू त्रासदायक ठरतो. ज्या लोकांना संधिवाताचा त्रास असतो त्यांना जास्त वेदनादायी ठरतो. या ऋतूमध्ये आर्द्रता आणि तापमानातील चढउतारांमुळे संधिवाताच्या रुग्णांच्या समस्या वाढतात. पावसाळ्यात संधिवाताच्या रुग्णांना सांधेदुखी, सूज, कडकपणा आणि इतर अनेक समस्या येऊ लागतात. त्यामुळे संधिवाताच्या रुग्णांनी पावसाळ्यात आहाराची काळजी घेणे गरजेचे असते.