White Discharge : सतत 'Vaginal Discharge' होण्यामागे असू शकतात ही कारणं; वेळीच व्हा सावध नाहीतर...

व्हाइट डिस्चार्जची नेमकी कारणं काय ते जाणून घेऊया
White Discharge
White Discharge esakal
Updated on

White Discharge : अनेक महिलांना Vaginal Discharge म्हणजेच व्हाईट डिस्चार्जची तक्रार असते. योनीमार्गातून होणाऱ्या पांढऱ्या स्त्रावामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही प्रकरणांमध्ये पांढरा स्त्राव सामान्य असू शकतो तर काहींमध्ये हे गंभीर आजाराचं लक्षणसुद्धा ठरू शकतं. तेव्हा व्हाइट डिस्चार्जची नेमकी कारणं काय ते जाणून घेऊया.

अनेकदा यीस्ट इंफेक्शन (Infection), अस्वच्छता यामुळे पिरीयड्सपूर्वी व्हाईट डिस्चार्ज (White Discharge) होण्याची शक्यता असते. असं होत असल्यास महिलांनी याकडे दुर्लक्ष न करता उपचार करून घ्यावे.

व्हाइट डिस्चार्जमागे असू शकतात ही कारणं

बॅक्टेरियल इन्फेक्शन

अनेकदा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे पिरीयड्सपूर्वी व्हाईट डिस्चार्ज होण्याची शक्यता असते.बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी महिलांना स्वच्छता बाळगणं फार गरजेचं आहे. गरज भासल्यास डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.

व्हिटॅमिनची कमतरता

व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे ही तक्रार महिलांमध्ये उद्भवू शकते. ही समस्या टाळण्यासाठी तुमच्या आहारात फायबरचा समावेश करावा. ज्यामध्ये तुम्ही ताजी फळं आणि भाज्यांचं सेवन करू शकता.

White Discharge
Men Health : चुकीचा आहार घेतल्याने पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर होतो वाईट परिणाम, हे वाचाच

यीस्ट इन्फेक्शन

यीस्ट इन्फेक्शन लक्षणं दिसू लागल्यावर पिरीड्सपूर्वी व्हाइट डिस्चार्ज होऊ शकतो.यावेळी तातडीने डॉक्टरांशी बोलून उपचार करून घ्यावा.

स्ट्रेस

अनेक महिलांमध्ये व्हाइट डिस्चार्जचं कारण हे स्ट्रेस असतं. ताणतणाव दूर करण्यासाठी तुम्ही ब्रिदींग एक्सरसाइज करायला हवी. योगा आणि मेडिटेशनही करू शकता. (Women Issues)

White Discharge
Women Attraction : पुरुषांच्या या गोष्टीकडे स्त्रीचं लक्ष आधी जातं

ही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांची मदत घ्यावी

कधीतरी योनीमार्गातून होणारा डिस्चार्ज हे संसर्ग असल्याचा संकेत असू शकतो.जर डिस्चार्ज असामान्यपणे पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचा असेल, चिकट असेल किंवा दुर्गंधी असेल तर ते इन्फेक्शनचं लक्षण असू शकतो. (Health)

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, योनीमार्गात खाज येत असेल किंवा जळजळ जाणवत असेल तर हे यीस्ट संसर्ग किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होऊ शकतं. जर तुम्हाला असामान्य दिसणारा किंवा दुर्गंधी असलेला कोणताही स्त्राव दिसला तर त्यावेळी सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com