प्रश्न १ - माझे वय फक्त १४ वर्षे आहे; परंतु आत्तापासून माझे केस पांढरे होत आहेत. यासाठी काय करावे?
- संजय शिंदे, पुणे
उत्तर - शरीरात अतिरिक्त उष्णता असणे, पित्तदोषाचे असंतुलन होणे तसेच खाण्या-पिण्यात होणाऱ्या चुका, चुकीच्या दिनचर्येमुळे शरीरातील अस्थिधातू व शुक्र धातूचे दोष उत्पन्न झाल्यास केस अकाली पांढरे होऊ शकतात. सध्या तरी शक्यतो घरचे सात्त्विक जेवण घ्यावे. रोज न चुकता संतुलन शतावरी कल्प घालून गाईचे दूध घेण्यास सुरुवात करावी. तेलकट, आंबट व फार जास्त चमचमीत पदार्थ आहारातून टाळलेले बरे. आहारात कच्चे मीठ कमीत कमी असावे.
रोज डोक्याला हलक्या हाताने संतुलन व्हिलेज हेअर तेलासारखे आयुर्वेदिक सिद्ध तेल लावणे आवश्यक आठवड्यातून १-२ वेळा ओल्या नारळाचे दूध डोक्याला लावून नंतर केस माइल्ड शांपूने धुवावे. शक्य झाल्यास संतुलन हेअर सॅन गोळ्या घेणे सुरू करावे. केस धुण्यासाठी संतुलन सुकेशा, संतुलन वात हेअर पॅक वा संतुलन पित्त हेअर पॅक व वापरावे. रोज नाकात नस्यसॅन घृताचे १-२ थेंब घालणे व नियमित पादाभ्यंग करण्याची मदत होऊ शकेल. एकदा रक्ताची तपासणी करून घेऊन कुठल्या जीवनसत्त्वाची कमतरता आहे का हे पाहणे योग्य ठरेल. मॅरोसॅन व धात्री रसायनासारखी रसायने सुरू केल्याचा फायदा मिळू शकेल.