Measles Vaccine : गोवर लसीचा शोध कोणी लावला? जाणून घ्या

सर्वात मोठी गोवरची लाट केव्हा आली? चला तर याविषयी आज आपण जाणून घेऊया.
Measles Vaccine
Measles Vaccinesakal

मागील काही दिवसांपासून गोवर आजार बऱ्यापैकी वाढलाय. महाराष्ट्रात तर गोवरने हाहाकार माजवलाय. त्यात मुंबईची संख्या सर्वाधिक आहे. गोवर आजार हा खरं पाहायला गेला तर खूप जुना आजार आहे. दरवर्षी सरकार गोवरची लस देत असतात. तरीसुद्धा गोवरवर नियंत्रण आणण्यात सरकार अपयशी पडलंय. (Measles disease)

गोवर हा साथीचा आजार आहे. जी एकदा आली की अनेकांवर भारी पडते. अशीच गोवरची साथ आता आलेली दिसून येत आहे. या आजारामुळे अनेक बालके दगावत असल्याचा आकडाही समोर आलाय. पण तुम्हाला माहिती आहे का की सर्वात मोठी गोवरची लाट केव्हा आली? चला तर याविषयी आज आपण जाणून घेऊया. (Who invented vaccine for Measles disease)

Measles Vaccine
Measles Infection : मुंबईत गोवरचा १५ वा बळी

वर्ष होतं १९५४, अमेरिकेतील मॅसॅच्युएट्सची राजधानी बोस्टनमध्ये यावर्षी गोवरची साथ आली. साथ एवढी मोठी होती की लाखो मुलांचा यावेळी गोवर आजाराने मृत्यू झाला. ही संपुर्ण जगाला हादरुन देणारं वर्ष होतं.

गोवर लसीचा शोध कोणी लावला? कधी लागला.

१९५४ मध्ये बोस्टनमधील बोर्डिंग स्कूलमध्ये असलेल्या मुलांना गोवर झाला होता. त्यावेळी या मुलांना उपचार करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या ब्लड सॅम्पल घेतले होते. या सॅम्पलमुळेच गोवरचा शोध लागला.

त्या काळात प्रसिद्ध बायोमेडिकल संशोधक म्हणून ओळखले जाणारे जॉन फ्रँकलिन एंडर्स यांनी एका विद्यार्थ्याच्या शरीरातून व्हायरसचे सॅम्पल घेतले. ज्या विद्यार्थ्याच्या शरीरातून व्हायरसचे सॅम्पल घेतले त्या विद्यार्थ्याचं नाव डेव्हिड एडमॉन्स्टन होतं. त्यामुळे या लसीला एडमॉन्स्टन-बी असं नाव देण्यात आलं.

Measles Vaccine
Measles vaccination : डब्ल्यूएचओ करणार लसीकरणाबाबत मार्गदर्शन

चार वर्षाच्या आत यावर लस तयार करण्यात आली. अनेक मुलांवर या लशींच्या चाचण्या घेण्यात आल्या.  चाचण्यांवरुन गोवरसाठी ही लस परफेक्ट असल्याचं दिसून आलं आणि अखेर १९६३ मध्ये या लशीला परवानगी देण्यात आली. 

सुरवातीला अमेरिका त्यानंतर इतर अनेक देशांमध्ये गोवरची लस देण्यास सुरवात झाली आणि आजही दरवर्षी अनेक मुलांना गोवरची लस दिली जाते. तरीसुद्धा महाराष्ट्रात आणि खास करुन मुंबईत येणारी गोवरची साथ ही चिंंताजनक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com