
Mental Health
sakal
नवी दिल्ली : दर सात जणांपैकी एक म्हणजेच अंदाजे जगभरातील एक अब्जाहून अधिक नागरिक सन २०२१ मध्ये मानसिक आरोग्य विकारांनी त्रस्त होते, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या मानसिक विकारांमध्ये चिंता आणि नैराश्यासंबंधीचे प्रमाण एकूण रुग्णांमध्ये दोन तृतीयांशाहून अधिक असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले. या मानसिक विकारांमुळे आर्थिक पातळीवर प्रचंड परिणाम होतो, असे संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेने म्हटले.