
WHO
sakal
नवी दिल्ली : खोकल्याचे औषध घेतल्याने मध्य प्रदेश, राजस्थान येथे लहान बालके दगावल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित वादग्रस्त कंपनीविरुद्ध कारवाई सुरू झाली आहे. आता, जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील खोकल्याचे औषध कोल्ड्रिफ, रेस्पिफ्रेश टीआर आणि रिलाइफ यांच्याविरोधात इशारा जारी करत ते निकृष्ट दर्जाचे जाहीर केले आहे. शिवाय, वादग्रस्त औषध आढळून आल्यास त्वरित माहिती देण्याचे आवाहन जगभरातील राष्ट्रीय नियामक अधिकाऱ्यांना केले आहे.