

Heart Palpitations After Coffee: 6 Warning Signs You Should Never Ignore
sakal
Heart Palpitations after Coffee: सकाळी उठल्या उठल्या काहींना चहा तर काहींना कॉफीने दिवसाची सुरुवात करण्याची सवय असते. खास करून ज्यांना झोप उडवायची असेल किंवा आळस कमी करून कामावर लक्ष केंद्रित करायचं असेल, ते कॉफी पितात. पण, कॉफी प्यायल्यानंतर काही वेळाने हृदयात किंवा छातीत जोरात धडधड जाणवणं किंवा हृदयाचे ठोके अचानक वाढणं असा त्रास काही लोकांना होतो.
कॅफीनमुळे असे होणे अनेकदा सामान्य असू शकते. मात्र, काही वेळा ही लक्षणे हृदयाशी संबंधित समस्या असल्याचे संकेतही देऊ शकतात. त्यामुळे वारंवार असा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, असं तज्ज्ञ सांगतात.