

Why Does Your Stomach Make Noises | Doctors Explain Reasons
sakal
Stomach Growling Explained: शांत वातावरणात अचानक पोटातून मोठा गुरगुरणारा आवाज येतो आणि क्षणभर सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे जातं. अशावेळी खूप लाजिरवाणं वाटतं, पण त्याहूनही जास्त गोंधळ उडतो. हा आवाज फक्त भूक लागल्याचा संकेत आहे की पचनसंस्थेत काहीतरी बिनसलंय? पोटातून सतत येणारे हे आवाज बऱ्याच जणांना सामान्य वाटतात, पण त्यामागचं कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे.
बहुतांश वेळा हे आवाज शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेचा भाग असतात. डॉक्टरही सांगतात, पोटातून येणारे हे आवाज वेदना, मळमळ, पोट जास्त फुगणं, जुलाब किंवा बद्धकोष्ठता यांसोबत नसतील, तर ते साधारणपणे सामान्यच असतात. पण पोटातून जे आवाज येतायत ते कशामुळे येत आहेत हे ओळखलं की पुढील गंभीर धोके टाळता येतात.