benefits of eating one fruit daily
benefits of eating one fruit dailyEsakal

Benefits of Fruits: दररोज एकतरी फळ खाणं का गरजेचं आहे?

benefits of eating one fruit daily: फळं खाण्याकडे अनेकजण गांभीर्याने पाहत नाहीत. मात्र निरोगी Healthy राहण्यासाठी आहारामध्ये दररोज एक तरी फळं खाल्ल्यास ते फायदेशीर ठरू शकतं.
Published on

Benefits of eating one fruit daily: आरोग्यदायी आयुष्यासाठी सकस आणि पौष्टिक आहार गरजेचा आहे. या आहारात फळांचा समावेश करणंही तितकच गरजेंचं आहे. अनेकजण आवडीनं फळं खातात. मात्र दररोज फळांच Fruits सेवन करत नाहीत. Why Eating Fruit everyday is necessary for good health

ज्याप्रमाणे आपण दररोजच्या जेवणात Meal भात किंवा चपाती न चुकता खातो तसं आपण दररोज एक तरी फळं Fruits खातो का? अनेकांचं उत्तर नाही असं असेल. कारण अनेकजण आठवड्यातून काही दिवसच एखादं फळ खातात.

फळं खाण्याकडे अनेकजण गांभीर्याने पाहत नाहीत. मात्र निरोगी Healthy राहण्यासाठी आहारामध्ये दररोज एक तरी फळं खाल्ल्यास ते फायदेशीर ठरू शकतं. आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारची पोषक तत्व आढळतात.

यातील काही पोषक तत्व ही दीर्घकाळ शरीरामध्ये राहतात. तर काही पोषकतत्व पाण्यासोबत शरीराबाहेर टाकली जातात. त्यामुळे या पोषक तत्वांची शरीरात कमतरता निर्माण होते. ही कमतरता भरून काढण्यासाठीच दररोज फळांचं सेवन करणं गरजेचं आहे.

दररोज एक फळं खाण्याचे फायदे

फायबरची कमतरता भरून निघते- अनेक फळं ही फायबरचा एक उत्तम स्त्रोत असतात. फळांमधील फायबरमुळे पचन क्रिया जलद होण्यास मदत होते. यामुळे पोटाचं कार्य सुरळीत चालतं. तसंच यामुळे बद्धकोष्ठता तसचं मुळव्याध यांसारख्या समस्या दूर होता.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर- वजन कमी कऱण्यासाठी फळांचं सेवन करणं हा एक उत्तम पर्याय आहे. कोणतही फळ खाल्ल्याने त्यातून मिळणाऱ्या फ्लेवोनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरात चरबी आणि ट्राइग्लिसराइड्स साचत नाही. त्यामुळे वजन वाढत नाही.

तसचं कलिंगड, पपई, टरबूज, सफरचंद अशा अनेक फळांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळत. यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि भूक लागत नाही. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

हे देखिल वाचा-

benefits of eating one fruit daily
Fruit Side Effect : रिकाम्या पोटी ही फळ खाऊ नयेत, पण का?

त्वचा आणि केस निरोगी होण्यास मदत- फळांमधील पोषक तत्वांमुळे केस आणि त्वता निरोगी राहण्यास मदत होते. फळांमधील फ्लेवोनॉइड्स आणि पॉलीफेनॉल्स रक्ताभिसरण चांगलं होण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे त्वचेतील कोलेजन बूस्ट होण्यास मदत होते आणि त्वचा स्वच्छ होऊन त्वचेचा पोत सुधारतो.

तसचं फ्लेवोनॉइड्स आणि पॉलीफेनॉल्समुळे त्वचेसोबतच केसांची चमक वाढते. तसचं फळांमधील विटामिन्समुळे केस गळती कमी होण्यास मदत होते आणि केस लांब होतात.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते- फळांमध्ये विटामिन आणि खनिजांसोबतच मोठ्या प्रमाणात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म आढळतात. यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते.

तसचं बॅक्टेरियाचा संसर्ग रोखण्यासाठी फळ फायदेशीर ठरतात. तसचं उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनची समस्या दूर करण्यासाठी देखील फळांचं सेवन उपयुक्त ठरतं.

शरीर डिटॉक्स करण्यास मदत- अनेक फळांमध्ये पाण्याच प्रमाण जास्त असतं. तसचं फळांमधील अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत होते.

तसचं फळांमधील फायबरमुळे पोट साफ होण्यासही मदत होते. फळांमधील मल्टिन्यूट्रियन्ट्स मुळे किडनी, लिवर आणि आतड्यांच्या समस्या दूर होतात.

निरोगी हृदयासाठी फायदेशीर- फळांमधील पोटॅशियम खरंच हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी मदत करत तसचं यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहून स्ट्रोकचा धोका कमी होतो. फळांमध्ये असलेल्या फॉलेसमुळे लाल रक्तपेशी वाढण्यास मदत होते.

अशा प्रकारे आहारात दररोज किमान एकदा तरी फळं खावं. तसचं प्रत्येत मौसमात त्या मौसमातील फळांचा आहारात समावेश करायला विसरू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com