World Breastfeeding Week: पहिले ६ महिने आईचं दूधच का असतं महत्त्वाचं? बाळाच्या आरोग्यासाठी जाणून घ्या कारण

Importance of Breastfeeding: बाळाच्या आयुष्यातील पहिले सहा महिने केवळ स्तनपान का महत्त्वाचे आहे आणि आईचे दूध बाळाला संसर्गांपासून संरक्षण देऊन रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास कशी मदत करते, जाणून घ्या.
World Breastfeeding Week: पहिले ६ महिने आईचं दूधच का असतं महत्त्वाचं? बाळाच्या आरोग्यासाठी जाणून घ्या कारण
Updated on

बाळाच्या आयुष्यातील पहिले सहा महिने हे त्याच्या आयुष्यभराच्या उत्तम आरोग्याचा पाया घालणारे अत्यंत महत्त्वाचे असतात. या काळात केवळ आईचे दूध (एक्सक्लुझिव्ह ब्रेस्टफीडिंग) हे बाळासाठी संपूर्ण पोषण देण्याबरोबरच विविध संसर्गांपासून नैसर्गिक संरक्षणही प्रदान करते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) शिफारशीनुसार, जन्मानंतरच्या पहिल्या सहा महिन्यांत बाळाला वैद्यकीय गरज नसल्यास आईच्या दुधाव्यतिरिक्त पाणी किंवा इतर कोणतेही अन्न अथवा पेय देऊ नये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com