- महेंद्र गोखले, फिटनेसविषयक प्रशिक्षक
निरोगी आणि अधिक सक्रिय जीवनशैलीचा मार्ग फिटनेस चाचणीतून जातो जी खूप महत्त्वाची असते; परंतु बरेच वेळा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. फिटनेस टेस्टिंगमध्ये आपल्या शरीराच्या फिटनेसची चाचणी केली जाते- ज्यामध्ये कार्डिओवस्कुलर इंड्युरन्स, स्नायूंची स्ट्रेंग्थ, लवचिकता आणि शरीररचना यासारख्या शारीरिक पैलूंच्या मूल्यांकनाचा समावेश होतो.