
Tuberculosis Awareness: जागतिक टीबी दिन दरवर्षी 24 मार्च रोजी साजरा केला जातो. जागतिक टीबी दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये या आजाराबद्दल जनजागरूकता निर्माण करणे आणि टीबी नियंत्रित करण्यासाठी केलेल्या कामगिरीची आठवण करून देणे हा होय.
जागतिक स्तरावर टीबी निर्मूलनासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे कौतुक करण्यासाठी हा दिवस विशेषतः साजरा केला जातो. आज संपूर्ण जग जागतिक टीबी दिन साजरा करत आहे, तर या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व काय हे सोप्या शब्दात जाणून घेऊया.