Men's Health Tips: पुरुषांनी लोणचे का खाऊ नये? कारण वाचाल तर अवाक व्हाल... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Men's Health Tips

Men's Health Tips: पुरुषांनी लोणचे का खाऊ नये? कारण वाचाल तर अवाक व्हाल...

Men's Health Tips: लोणच्याचे नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटावे असा हा पदार्थ आहे. लोणचं कुठल्याही खाद्यपदार्थला चव देते. चटकदार चवीमुळे लोणचे परत परत खावेसे वाटते. मात्र तुम्ही लोणच्याचे अतिप्रमाणात सेवन केले तर त्याचे विपरीत परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. पुरुषांच्या बाबतीत यामुळे गंभीर समस्या उद्भवतात.

विकतच्या लोणच्यामध्ये बरेच प्रिझरवेटीव्ह्ज असतात. लोणच्यामध्ये अतिप्रमाणात अॅस्टामिप्रिड असते जे आपल्या आरोग्याला हानिकारक ठरते. अॅस्टामिप्रिड हे एक प्रकारचे कार्बन आहे. तुमच्या लैंगिक जीवनातही या पदार्थामुळे अडथळे निर्माण होतात. (Health)

कोलेस्टेरॉलचा धोका

घरघुती लोणचेही मर्यादित प्रमाणात वापरण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा बाजारात लोणचे तयार केले जाते तेव्हा ते चवदार बनवण्यासाठी त्यात जास्त तेल आणि जास्त मसाले घातले जाते. जे आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. लोणच्यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळे कोलेस्ट्रॉल व इतर शारीरिक समस्यांचा धोका उद्भवतो.

हेही वाचा: Winter Health : सतत आजारी पडत असाल तर या सवयी लगेच बदला

लोणचे खायचे झाल्यास क्वचित खा. अन्यथा कमी तेलाचे व मसाल्याचे लोणचे बनवा. जेणेकरून तुमच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होणार नाही.