
महेंद्र गोखले - फिटनेसविषयक प्रशिक्षक
आपण कोणत्या जिमला जावे हे जाणून घेणे आवश्यक आहे- कारण ते एक फिटनेसचे मंदिर आहे. आपण हॉस्पिटल निवडताना पॅनेलवरील डॉक्टर कोण आहेत किंवा ते हॉस्पिटल चालवणारे सर्वजण व्यवसाय म्हणून बघतात का खरंच त्यांना पेशंट्सबद्दल आस्था आहे हे बघतो; तसेच जिम चालवणाऱ्या लोकांना खरेच फिटनेसबद्दल, व्यायामाबद्दल आस्था आहे का, हेही बघावे. जिमसाठी भरावे लागणारे पैसे हा खरेतर शेवटचा निकष असावा- कारण आत्ताच्या स्पर्धात्मक व्यवसायात आपल्याला अनेक स्वस्त पर्याय मिळू शकतात; पण त्यांचा दर्जा निकृष्ट असू शकतो. अशी जिम कदाचित आपली व्यायामाची आणि फिटनेसची उद्दिष्टे पूर्ण करू शकणार नाहीत. माझा अनुभव सांगतो, की बरेच लोक वायफळ खर्च, जंकफूड यावर पैसे खर्च करतात; पण जिमच्या फीसाठी घासाघीस करतात.