

Doctors Advise Fiber-Rich Foods and Hydration to Prevent Digestive Issues in Winter: हिवाळ्यात पचनसंस्थेच्या समस्यांनी डोके वर काढले जाते; त्याचबरोबर पोट जड वाटणे, तहान कमी लागणे, पोट साफ न होणे, त्याची वेळ अनियमित होणे, बद्धकोष्ठता वाढणे ही लक्षणे त्यापैकी काही आहेत. मात्र, पोटविकारतज्ज्ञांच्या मते ऋतूमुळे होणारा हा बदल आहे. यामध्ये थंड हवामानामुळे तहान कमी लागणे, आतड्यांमधील पाण्याची कमतरता, शारीरिक हालचाल कमी होणे आणि आहारात तंतुमय घटक (फायबर) कमी झाल्याने पचनक्रियेचे कार्य मंदावते. त्यामुळे हिवाळ्यात पचनसंस्थेची काळजी घेण्याचे आवाहन पोटविकारतज्ज्ञ करतात.