
Cold And Cough In Winter: हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. या दिवसांमध्ये लहान मुले आणि वृद्ध आजारी पडतात. थंडीच्या दिवसात रोगप्रतिकारशक्ती खूपच कमकुवत होते, त्यामुळेच या काळामध्ये सर्दी, ताप यासारख्या समस्यांचा धोका असतो. आजकाल तुम्हालाही सर्दी-खोकल्याचा त्रास होतो का?
जेव्हा आपल्याला सर्दी होते तेव्हा आपण सर्वजण कफ सिरप पितो, ज्यामुळे आपल्याला काही वेळात आराम मिळतो. पण प्रत्येक वेळी खोकला आल्यावर कफ सिरप पिणे टाळावे. तुम्ही सोप्या घरगुती उपायांचा देखील वापर करू शकता.