Winter Health : धोक्याचा इशार! अजून ४ पटीने वाढणार फ्लू चं प्रमाण, तज्ज्ञ सांगतात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter Health

Winter Health : धोक्याचा इशार! अजून ४ पटीने वाढणार फ्लू चं प्रमाण, तज्ज्ञ सांगतात...

Winter Health Tips For Influenza : सध्या जगभरामध्ये ‘इम्युनिटी डेब्ट’ या चिंताजनक गोष्टीचा प्रभाव असल्याने या मोसमात फ्लूचे प्रमाण वाढेल असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. इम्युनिटी डेब्ट म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत एकमेकांपासून अंतर राखून राहिल्याने किंवा मास्क घालून राहिल्याने त्यांना नेहमीच्या सर्वसाधारण विषाणूंचाही संसर्ग झालेला नाही.

तस्लीम अली आणि सहकाऱ्यांनी (२०२२ मध्ये) केलेल्या संशोधनानुसार पॅनडेमिकमुळे घातले गेलेले निर्बंध दूर झाल्यावर याच लोकसंख्येला इन्फ्लुएन्झाचा संसर्ग होण्याची शक्यता १० ते ६० टक्क्यांनी वाढली आहे.

यामुळे चालू २०२२-२३ च्या मोसमात फ्लूच्या घटनांमध्ये चार पट वाढ होण्याची शक्यता आहे. भारतात २०२२ मध्ये गोळा केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, दिल्ली, तामीळ नाडू, कर्नाकट, प. बंगाल, पंजाब व इतर राज्यांत फ्लूच्या रुग्णांमध्ये आधीच लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. देशातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे व गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १५पट वाढ नोंदविण्यात आली आहे.

अबॉट इंडियाचे मेडिकल अफेअर्स डिरेक्टर डॉ. जेजो करणकुमार सांगतात, “इन्फ्लुएन्झा हा लसीकरणाद्वारे रोखता येण्याजोगा आजार आहे आणि स्वत:ला व आपल्या कुटुंबाला या आजाराशी संबधित आरोग्य समस्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना करता येणे शक्य आहे. सर्व प्रकारच्या लोकसंख्यागटांमध्ये केवळ मुलांनाच नव्हे तर आजारांचा धोका अधिक असलेल्या प्रौढांनाही इन्फ्लुएन्झाविरोधात बहुस्तरीय सुरक्षा पुरविणे महत्त्वाचे आहे.”

फ्लूपासून संरक्षण मिळविण्यासाठी उपाय

  • आपले व आपल्या कुटुंबाचे संपूर्ण लसीकरण करून घ्या.

  • मुलांचे लसीकरणाचे वेळापत्रक सांभाळावे आणि प्रौढांसाठीही वार्षिक फ्लू शॉट घ्यावा.

  • दरवर्षी फ्लूची लस घेणे हे महत्‍वाचे आहे कारण दरवर्षी फ्लूच्या विषाणूमध्ये बदल होत असतात आणि WHO ने शोधलेल्या सर्वात नव्या प्रकारानुसार हे फ्लू शॉट्स विकसित केले जात असतात.

  • आपले हात नियमितपणे धुवा. त्यासाठी साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल-बेस्ड सॅनिटायझरचा वापर करा.

  • आपल्या डोळ्यांना, नाकाला, तोंडाला स्पर्श करणे टाळा आणि सतत हाताळल्या जाणाऱ्या वस्तूंना निर्जंतूक करून घ्या.

  • आजारी व्यक्तींशी निकट संपर्क टाळा, घरांमध्ये हवा खेळती राहू द्या आणि गर्दी असलेल्या सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा.

  • ताप, थंडी भरणे, खोकला, नाक गळणे/चोंदणे, अंगदुखी आणि अशा फ्लूच्या इतर चिन्हांवर लक्ष ठेवा.

टॅग्स :Influenza Vaccine