
Bajra Roti Benefits: हिवाळ्यात अनेक घरांमध्ये गव्हाऐवजी बाजरीची भाकर खातात. असे म्हटले जाते की हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि चांगले आरोग्य राखण्यासाठी गव्हाच्या चपातीपेक्षा बाजरीची भाकर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
बाजरी हे एक सुपरफूड आहे. ज्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरने समृद्ध आहे. प्रथिने, फायबर, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम यांसारखी महत्त्वाची खनिजे बाजरीच्या रोटीमध्ये जास्त प्रमाणात आढळतात, असे खाद्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शरीराला ऊर्जा देण्यासोबतच पचनसंस्थाही निरोगी राहते. बाजरी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यास मदत करते. याशिवाय, हाडं मजबूत करण्यासाठी, हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्वचा चमकदार ठेवण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. हिवाळ्यात बाजरीची भाकर खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.