

Winter Stroke Alert: Immediate Medical Help Is Crucial
esakal
हिवाळा सुरू होताच स्ट्रोकच्या (पक्षाघात) रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. इंडियन स्ट्रोक असोसिएशनच्या माहितीनुसार, भारतात दरवर्षी सुमारे १५ लाख नवीन स्ट्रोक रुग्ण आढळून येतात. मृत्यू आणि दीर्घकालीन अपंगत्वाची ही एक प्रमुख कारणे ठरत असून, बदलती जीवनशैली आणि दीर्घकालीन आजारांमुळे ही संख्या चिंताजनकरीत्या वाढत आहे.