- डॉ. मालविका तांबे
कोहळा वेलीवर येणारे एक फळ आहे, ज्याला संपूर्ण भारतात भाजी करण्यासाठी वापरले जाते. हे फळ अनेक वर्षे टिकते. मोठ्या आकाराचे असते व त्यावर पांढऱ्या रंगाचे मऊ रोम अर्थात लव असते. याला इंग्रजीत White gourd, Ash gourd or Winter melon म्हटले जाते. मराठीत याला कोहळा व हिंदीत पेठा म्हटले जाते. दक्षिण भारतात कोहळ्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
त्या मानाने महाराष्ट्र व मध्य भारतात याचा वापर कमी प्रमाणात केलेला दिसतो. कोहळा आरोग्यासाठी अत्यंत उत्तम असतो, शरीराची पुष्टी करतो, बुद्धिवर्धक असतो. म्हणून आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये याला खूप उच्च स्थान मिळालेले आहे. बऱ्याच जागी पूजा, मंत्र-तंत्र, टोटकामध्येसुद्धा कोहळ्याचा वापर केलेला दिसतो.