
Bath Soap For Winter: थंडीच्या दिवसात कमी तापमानामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होऊ शकते. थंड हवेच्या संपर्कात आल्याने त्वचेचा कोरडेपणा वाढू शकतो. त्याच वेळी, जर तुम्ही हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणारी उत्पादने आणि साबणाचा योग्य वापर केला नाही तर ते तुमच्या त्वचेला खूप नुकसान करू शकते. सोरायसिस आणि एक्जिमासारख्या त्वचेच्या समस्या हिवाळ्यात गंभीर होऊ शकतात. त्यामुळे लोकांना हिवाळ्यात त्वचेच्या गरजेनुसार त्वचेची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे वातावरणानुसार साबणही वापरायला हवी.