तर काय?

माझं वय ४० वर्षे आहे. गेले काही वर्षे पाळीच्या वेळेला माझं प्रचंड प्रमाणात डोकं दुखतं. कधी कधी उलट्यासुद्धा होतात.
woman Menstruation Vomiting and diabetes

woman Menstruation Vomiting and diabetes

sakal

Updated on

प्रश्न - माझं वय ४० वर्षे आहे. गेले काही वर्षे पाळीच्या वेळेला माझं प्रचंड प्रमाणात डोकं दुखतं. कधी कधी उलट्यासुद्धा होतात. तसेच अंगात ताप मुरलाय असेही वाटतं. पाळीनंतर एक दोन दिवस लघवीला जळजळ झाल्यासारखे वाटते. यावर कृपया उपाय सुचवावा.

- वृषाली मोरे

उत्तर - शरीरात हार्मोन्सचे असंतुलन असले की स्त्रियांना पाळीच्या वेळेला अशा प्रकारचे पित्ताचे त्रास होताना दिसतात. सकाळ-सायंकाळ संतुलन पित्तशांती गोळ्या किंवा प्रवाळ पंचामृत मोतीयुक्त गोळ्या घ्यायला सुरुवात करावी. रात्री झोपताना संतुलन फेमिसॅन तेलाचे पिचू ठेवणे उत्तम. जेवण झाल्यावर सकाळी व सायंकाळी संतुलन सॅनकुल चूर्ण एकएक चमचा साध्या पाण्याबरोबर घ्यावा. दुधामधून संतुलनचे शतानंत कल्प टाकून घेतलेले उत्तम राहील.

आठवड्यातून दोन तीन वेळा तरी संतुलनचे पादाभ्यंग करावे व तसेच संतुलनच्या शक्ती धूपाचा वापर करणं चांगले. शक्य असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊन यावर व्यवस्थित उपचार करावेत. म्हणजे मेनोपॉजल फेजमध्ये जाण्यापूर्वी हार्मोन्सचं संतुलन नक्की राखता येऊ शकेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com