Women Health : गर्भाशयाला सूज आली, काही इजा झाली तर दिसतात ही लक्षणे,वेळीच तपासणी करून घ्या

पाय किंवा कंबरेमध्ये वेदना जाणवू शकतात
Women Health
Women Healthesakal

Women Health :

आता सगळ्याच क्षेत्रात डिजीटायझेशन झालं आहे. तंत्रज्ञानात प्रगती झाल्यामुळे शारीरिक श्रम कमी होऊन मानसिक श्रम वाढले आहेत. शिवाय तासन् तास एकाच जागी बसून काम करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. महिलांच्या दृष्टीने ऑफीस वर्क जास्त फायद्याचं असं म्हटलं जात होतं. पण याच तासन् तास एकाच जागी बसून काम करण्याचे दुष्परिणाम आता समोर येत आहेत.

कामाचे ८ ते १० तास एकाच जागी सलग बसून काम करणं, व्यायामाचा अभाव, कामाचा आणि इतरही वाढते ताण, सकस आहाराची कमतरता या सगळ्याचा स्त्रियांच्या शरीरावर गंभीर परिणाम होताना दिसून येत आहेत.

Women Health
Womens Tour : मैत्रिणींनो, इथे फिरा,खा मज्जा करा, हे आहेत तुमच्यासाठी सर्वात सुरक्षीत देश!

या समस्या केवळ मानसिक नाहीतर शारीरिकही आहेत. सध्या महिलांच्या गर्भाशयातही समस्या असू शकते. या स्थितीकडे दुर्लक्ष केल्याने काहीवेळा गर्भाशयाचे नुकसान होऊ शकते. अशा स्थितीत तुम्हाला अनेक प्रकारची लक्षणे दिसू शकतात. गर्भाशयाला इजा झाल्यावर दिसणाऱ्या काही लक्षणांबद्दल जाणून घेऊया.

गर्भाशयाला इजा झाल्यास महिलांना एका आठवड्यापेक्षा जास्त काळ मासिक पाळी येण्याची समस्या उद्भवू शकते. या स्थितीत महिलांना रक्तस्त्राव होत राहतो. अनेक वेळा स्त्रिया ही दुसरी समस्या असल्याचे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. या स्थितीकडे दुर्लक्ष केल्याने कधीकधी इतर रोगांची लागण होऊ शकते.

Women Health
Women Health Tips : सिझेरियनच्या टाक्यांमध्ये इन्फेक्शन पसरलंय हे कसं ओळखावं? त्यावर काय उपाय करावे?

सतत लघवी होणे

कधीकधी समस्या किंवा गर्भाशयाला नुकसान झाल्यामुळे लघवीशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. या स्थितीत सतत लघवी होण्याती समस्या उद्भवते. वास्तविक, जेव्हा गर्भाशयाला इजा होते, तेव्हा मूत्राशयावर दबाव निर्माण होऊ लागतो, ज्यामुळे पेल्विक स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे लघवीला त्रास होतो आणि कधी कधी नकळत लघवीची गळतीही होते.

Women Health
Womens Health Tips : मैत्रिणींनो, तुम्ही निरोगी आहात का? मासिक पाळीचा रंग सांगतो सर्वकाही!

अनियमित मासिक पाळी

काहीवेळा, मासिक पाळीत अनियमितता हे देखील गर्भाशयात झालेल्या इजेमूळे असू शकते. त्यामुळे जर तुमची मासिक पाळी नियमित होत नसेल तर ती गर्भाशयाशी संबंधित एक मोठी समस्या असू शकते. या स्थितीकडे दुर्लक्ष करण्याऐवजी, आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या स्थितीत तुम्हाला शरीराच्या काही भागात वेदनाही जाणवू शकतात.

Women Health
Women Health : मासिक पाळीच्या आधी स्तनांमध्ये दुखणं सामान्य आहे का?

पाय किंवा पाठदुखी

गर्भाशयात काही बिघाड असल्यास शरीराच्या काही भागात वेदना तसेच पाय किंवा कंबरेमध्ये वेदना जाणवू शकतात. या अवस्थेत गर्भाशयाच्या पेशी प्रभावित होतात. ज्यामुळे पाय दुखण्याव्यतिरिक्त, कंबरेच्या आजूबाजूच्या भागात कडकपणा किंवा वेदना देखील होऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com