
Women Health Care Tips: उत्तम आरोग्याचा लाभ आयुष्यभर मिळण्यासाठी आहार आणि व्यायाम यांचं योग्य नियोजन करावं लागतं. आणि हे स्त्रियांच्या बाबतीत विशेष महत्त्वाचं ठरतं. कारण स्त्री आपल्या आयुष्यामधे अनेक वेगवेगळ्या अवस्थांमधून जाते. लहान बालिका, वयात आलेली किशोरी, तरुणी, गरोदर अवस्थेतून आणि नंतर प्रसूतीनंतरच्या अवस्थेतून जाणारी स्त्री, प्रौढ स्त्री, रजोनिवृत्तीची अवस्था आणि साठीनंतरची वृद्धावस्था अशा आठ विविध अवस्थांमधून स्त्रीला जावं लागतं.
या प्रत्येक अवस्थेमधली शरीराची गरज वेगवेगळी असते, हे लक्षात घेऊन जर आहार आणि व्यायामाचं नियोजन झालं तर मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, सांधेदुखी, अकाली वार्धक्य, कर्करोग अशा व्याधींना वेळीच प्रतिबंध होतो आणि उत्तम आरोग्याचा अखंड लाभ होतो.