

आशा नेगी - लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत
जागतिक महिला दिन शनिवारी साजरा झाला. हा स्त्रियांच्या कर्तृत्वाचा गौरव, त्यांचे कौतुक, सन्मानचिन्हे, पुरस्कार यांचा दिवस... पण खरंच स्त्रीचं योगदान एका दिवसापुरतं आहे का? तिच्या जिद्दीचा, तिच्या कष्टाचा, तिच्या प्रेमाचा सन्मान फक्त २४ तासांपुरताच का?
स्त्री म्हणजे बळ, स्त्री म्हणजे करुणा, स्त्री म्हणजे धैर्य आणि स्त्री म्हणजे स्वतःला हरवून इतरांसाठी झटणारी ती शक्ती! पण या झटणाऱ्या प्रवासात, ती स्वतःला विसरते, स्वतःशी संवाद हरवते.