
World Aids Day 2024: दीड महिन्याची गर्भवती २२ वर्षीय महिला महापालिकेच्या दवाखान्यात आली. डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे तिच्या इतर तपासण्या व ‘एचआयव्ही’चीदेखील तपासणी केली, जी पॉझिटिव्ह आली. नंतर पुन्हा पक्के निदान करण्यासाठी ‘आयसीटीसी’ (एचआयव्ही तपासणी व समुपदेशन केंद्र) सेंटरला तपासणी केली, तीदेखील पॉझिटिव्ह आली. हे पाहून महिलेला धक्काच बसला. कारण तिला हा आजार होता हे देखील माहीत नव्हते. नंतर तिचे समुपदेशन केल्याने व औषधोपचार घेतल्याने तिचे होणारे बाळ मात्र निरोगी जन्माला आले. अशाप्रकारे गेल्या पाच वर्षांत शहरात २१२ गर्भवतींना ‘एचआयव्ही’चे अपघाताने निदान झाले आहे.