
World Anesthesia Day 2025 |Medical experts say local anesthesia is safer and more effective than general anesthesia.
sakal
Anesthesia Now Become Easier and Safer: सुमारे पाच ते सात दशकांपूर्वी शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला भूल द्यायची तर त्यावेळी भुलीच्या औषधाचा परिणाम दीर्घकाळ राहायचा. तो रुग्ण भूल दिल्यावर सायंकाळपर्यंत आणि सकाळपर्यंत झोपायचा. मात्र, आता अर्ध्या तासाची छोटी शस्त्रक्रिया असेल तर तितक्याच वेळेपुरती भूल देता येते. पूर्वी संपूर्ण शरीराला भूल द्यावी लागायची. मात्र, आता हाताच्या बोटाला शस्त्रक्रिया करायची असेल तर त्या बोटापुरती (लोकल) तसेच हाताला किंवा पायापुरती (रिजनल) भूल देता येते. अशा या शास्त्रामध्ये प्रगती होत असून, ती पूर्वीच्या तुलनेत अधिक प्रभावी व सुरक्षित झाली आहे.