
Blood donation eligibility criteria: दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. 1868 मध्ये याच दिवशी प्रसिद्ध इम्युनोलॉजिस्ट कार्ल लँडस्टाइनर यांचा जन्म झाला असं मानलं जातं. कार्ल लँडस्टाइनर यांनी एबीओ रक्तगट प्रणाली शोधून काढली, त्यानंतर मानवांमध्ये वेगवेगळे रक्तगट सापडले. या शोधानंतरच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला रक्तदान करणे शक्य झाले. रक्तदान हे एक महान दान मानलं जातं कारण ते एखाद्याला नवीन जीवन देते.