
warning signs of brain tumor: बंद कवटीत ब्रेन ट्यूमर तयार होऊ लागतो, त्याचा दाब मेंदूवर पडतो. त्यानंतरच ब्रेन ट्यूमरची लक्षणे दिसू लागतात. ७५ ते ८० टक्के रुग्णांना लक्षणेच माहिती नसतात. ब्रेन ट्यूमरबाबत समाजात जागरूकता नसल्यामुळेच निदान उशिरा होते. यामुळे उपचार कठीण होत असल्याचे निरीक्षण मेंदूरोग शल्यचिकित्सकांनी नोंदविले आहे.