

Clinical Success Stories: Defeating Clinoidal Meningioma and Brainstem Tumors with Absolute Precision
Sakal
डॉ. जयदेव पंचवाघ मेंदू आणि स्पाइन सर्जन
जागतिक ब्रेन ट्युमर दिवस काल झाला. ‘ब्रेन ट्युमर’विषयी जनजागृती करणं आणि ‘ब्रेन ट्युमरग्रस्त’ रुग्णांना मानसिक उभारी देणं हा या दिवसाचा उद्देश. ‘जागतिक ब्रेन ट्युमर दिन’ हा ‘भीतीचं योग्य वेळी निरसन करून योग्य पावलं न उचलल्यास माणसाला नाहक जीव गमवावा लागू शकतो’ याची आठवण करून देणं आणि आजाराच्या प्राथमिक लक्षणांविषयी माहिती देणं यासाठी महत्त्वाचा ठरतो.