
World Cancer Day : लूकची पर्वा न करता कँसर पेशंट्ससाठी सेलिब्रीटीजने केलं हे मोठं काँप्रमाइज
World Cancer Day 2023 : कँसर रुग्णांना अनेक शारीरिक मानसिक त्रासातून जावं लागतं. किमो थेरपीमध्ये त्यांना शारीरिक यातना होतातच, पण त्यानंतर जाणाऱ्या केसांमुळे त्यांना टक्कल पडतं. त्यामुळे समाजात इतर कोणाला भेटण्याविषयी, समोर जाण्याविषयी त्यांना अवघडलेपण येतं. या एका वेगळ्या मानसिक ताणातून त्यांना जावं लागत असतं. अशावेळी त्यांच्यासाठी विग वापरणे हा पर्याय दिलासा दायक ठरतो.
अशा रुग्णांसाठी बरेच लोक पुढाकार घेतात. पण बहुतांश लोकांना याविषयी कल्पनाच नसते. पण आपले काही सेलिब्रिटीजनी आपल्या स्वतःच्या लूकची पर्वा न करता या रुग्णांसाठी केस दान केले. जाणून घेऊया कोण आहेत हे सेलिब्रिटीज.

World Cancer Day
चंद्रमुखी चौटेला म्हणून गाजलेली कविता कौशिकने मागे आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. एक फोटो तिने टाकला होता ज्यात ती अतिशय लहान केसांमध्ये दिसत होती. ही कोणतीही फॅशन नव्हती तर चांगल्या कामासाठी केस दान केले होते.

World Cancer Day
धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा मुलगा रेयानने पण कँसर पेशंटसाठी केस दान केले होते. याविषयीचा इंस्टाग्राम व्हिडीओ पोस्ट करत माधुरीने लिहीलं होतं की, प्रत्येक हिरो कॅप घालत नाही, पण माझा मुलगा घालतो. खास कँसर डे ला मी तुम्हा सगळ्यांसोबत काहीतरी शेअर करू इच्छीते. रेयान जेव्हाही कोणा कँसर पेशंटला कीमो थेरपीसाठी जाताना बघायचा तर त्याला वाइट वाटायचं. अशात माझ्या मुलाने कँसर सोसायटीला माझे केस देण्याचा निर्णय घेतला.

World Cancer Day
बॉलिवूड सेलिब्रिटी कोरियोग्राफर मेल्विन लुईसने कँसर पेशंटच्या विगसाठी केस दान केले होते. केस कापण्याादी मेल्विनने साधारण ८ वर्ष केस वाढवले होते. याचे फोटो शेअर करताना त्याने लिहीलं होतं की, या सर्व घटने मागे त्याच्या एका फ्रेंडच्या भाच्यांच श्रेय आहे. त्यांनी कँसर पेशंट्स ना केस दान केले होते त्यावरून त्याला प्रेरणा मिळाली.
साऊथची अभिनेत्री ओवियाने एका संस्थेला केस दान केले होते. ही संस्था कँसर पेशंटसाठी विग बनवण्याचं काम करते. ओविया विषयी अशी अफवा त्यावेळी पसरली होती की, डिप्रेशनमध्ये तिने हे काम केलं होतं. पण त्यावर व्हिडीओ बनवून तिने याचं खंडन केलं होतं.
याशिवाय तमिळ अभिनेत्री निशाने पण केस कापून मदत केली होती. तिने आपल्या केस कापलेल्या केसांच्या फोटो सोबत लिहीलं होतं, पहिल्यांदा चांगल्या कामासाठी केस कापले आहेत. आशा आहे आता एखाद्या कँसर पेशंटला विग घालता येईल.
साऊथ अभिनेत्री काव्या शास्त्रीने जवळच्या व्यक्तीला कँसरमुळे गमावलं होतं. तिने किमो थेरपीतून जातानाच्या वेदना जवळून बघितल्या होत्या. त्यामुळे अशा रुग्णांना केस दान करण्याचं ठरवून आपल्या हेअरस्टाइलिस्ट सोबत फोटो पोस्ट केला होता.